Home क्राईम वाघोड येथे शेतातून ठिबक नळ्या अन स्प्रिंकलरची चोरी

वाघोड येथे शेतातून ठिबक नळ्या अन स्प्रिंकलरची चोरी


रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील वाघोड येथे शेती-शिवारातून सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे ठिबक नळ्या व मीनी स्प्रिंकलर चोरुन नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत अज्ञात चोरटयां विरुध्द गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, दि १४ फेब्रूवारीच्या रात्री वाघोड शिवारातील गट ४५६ व गट नंबर ४०२ या शेतातून अनुक्रमे जैन कंपनीचे मीनी स्प्रिंकलर १६ एम एम ठिबक नळ्या १५०० मीटर नळीची आणि फुलनारे स्प्रिंकलर १५० नग तर दुसऱ्या शेतातुन नेटाफिम व जैन कंपनीच्या नागाजुन ठिबक नळ्या चारुन नेल्या आहेत. या बाबत सुरेश लक्ष्मण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हाची नोंद रावेर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अर्जुन सोनवणे करीत आहेत.


Protected Content

Play sound