रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील वाघोड येथे एका २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील वाघोड येथील नम्रता कुंभार (वय२२) या विवाहितेचे आज सायंकाळी विषारी द्रव्य पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. या तरूणीने नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचे कारण समजले नसून या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.