अमळनेर, प्रतिनिधी| तालुक्यातील डांगरी येथील शिक्षक ललित पाटील यांना यंदाचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी उपसभापती स्व. वसंतराव डावखरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील रहिवासी ललित पाटील यांना जाहीर झाला आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान ललित पाटील हे पालघर येथील वाडा तालुक्यामधील नेहरोली येथे शारदा विद्यालयात कार्यरत आहेत. उत्तम वक्ते, कवी-लेखक, मराठी भाषेचे तज्ज्ञ मार्गदर्शक, देशीवादाचे अभ्यासक, पुणे येथील बालभारतीचे मराठी भाषा राज्य अभ्यास मंडळाचे सदस्य व अध्यापनात नवनवीन प्रयोग करणारे उपक्रमशील शिक्षक म्हणून पाटील हे परिचित आहेत. दरम्यान पुरस्कार हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे १३ नोव्हेंबर रोजी वितरीत करण्यात येणार आहे.