बोदवड प्रतिनिधी । उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत वराड बुद्रुक येथे ग्रामस्तरीय कोरोना समिती स्थापन करण्यात आली.
समितीच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही तसेच गावात सार्वजनिक ठिकाणी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही याची दक्षता घेण्याचा सर्वानी संकल्प केला. गावात बाहेर गावाहून व प्रांतातून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली.
गावातील नागरिकांना आपल्या घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींना आपल्या स्वतःच्या घरातच 14 दिवस थांबून राहण्याच्या सूचना देण्यात आल्या या प्रसंगी सरपंच सुशील भिल, तलाठी एम.पी.राणे, ग्रामसेवक गणेश चौबे, पोलीस पाटील अरुणा जगताप, गोपाल पाटील, अंगणवाडी सेविका विजयाबाई बडगुजर, अंजली पुरुषोत्तम पाटील, आरोग्य सेविका रुचाली पेठे, आशासेविका अनुसया पाटील व गावातील प्रतिष्ठीत नागरिक गावात सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.