Home धर्म-समाज वराड बुद्रुक येथे ग्रामपंचायत सदस्य मोरे यांच्याकडून तणनाशक फवारणी

वराड बुद्रुक येथे ग्रामपंचायत सदस्य मोरे यांच्याकडून तणनाशक फवारणी

0
53

बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | बोदवड तालुक्यातील वराड गावातील नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे यांनी आपल्या स्व:खर्चाने गावातील स्मशान भूमी परिसरात आपल्या हाताने तणनाशक फवारणी केली आहे.

तसेच त्यांचे सहकारी अजय पाटील यांचे कडून स्मशान भूमी परिसरात झाडे लागवड करण्यात आली जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. असे अजय पाटील यांनी म्हटले आहे. तसेच दर वर्षी आम्ही हे काम जबाबदारीने पार पाडू असे पण त्यांनी सांगितले. कारण वृक्ष लागवड ही काळाची गरज असून गावातील प्रत्येक नागरिकाने आपल्या दारी किमान एक वृक्ष लावावे व त्याचे संगोपन करावे, असे आवाहन अजय पाटील संतोष मोरे यांनी गावातील लोकांना केले आहे. तसेच लवकरच गावातील लोकांना घरा परत एक वृक्ष लागवड करण्यासाठी अजय पाटील व संतोष मोरे यांच्याकून देणार असल्याच त्यांनी सांगितले. या कामाबद्दल त्यांचे सर्वीकडून कौतुक होतं असंल्याच दिसत आहे.


Protected Content

Play sound