भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक तालुक्यातील वरणगाव येथे उद्या १८ रोजी जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.
या बैठीकीला भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवक जिल्हाध्य्क्ष रवींद्रनाना पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष अरविंद मनकरी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांची उपस्तीथी राहणार आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांची हितगुज साधून आगामी पक्षाची रणनीती ठरविण्यात येणार आहे. नागेश्वर मंदिर रोडवरील मराठा समाज मंगल कार्यालय येथे सायंकाळी ४ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला सोशल डिस्टन्स ठेऊन सर्व प्रकारची खबरदारी घेऊन बैठक होणार आहे.
कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
या बैठकीला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्तीथी द्यावी, असे आवाहन तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, युवक शहराध्यक्ष प्रशांत मोरे, अल्पसंख्याक विभागाचे पप्पू जकातदार, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गजानन वंजारी यांनी केले आहे.