वरणगावला शिवभोजन थाळी केंद्राचे उद्या उदघाटन

 

 

 

वरणगाव  ( ता – भुसावळ ) : प्रतिनिधी ।  महाराष्ट्र दिनच्या औचित्यावर  महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेला शिवभोजन थाळी केंद्राचे उदघाटन 1 मेंरोजी दुपारी बस स्टॅन्ड चौकात, हॉटेल एकच प्याला अमृततुल्य येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

 

शिवभोजन थाळी केंद्राचे उदघाटन मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्रभैय्या पाटील तसेच भुसावळचे नायब तहसीलदार शशिकांत इंगळे, वरणगाव न.पा.चे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या हस्ते होणार आहे.

 

शहरातील गरीब कष्टकरी गरजू यांच्यासाठी ‘शिवभोजन’ थाळी केंद्र वरणगावात उद्यापासून सुरु होत आहे. या ‘शिवभोजन’ थाळी केंद्राच्या माध्यमातून गरीब, कष्टकरी गरजू यांच्यासाठी सकसआहार मिळणार आहे. ‘शिवभोजन’ थाळी दररोज सकाळी 11 वाजता भेटेल.. कामगार, कष्टकरी गरजू यांनी या थाळीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे संचालक संतोष माळी यांनी केले आहे.

Protected Content