वयाच्या ८७ व्या वर्षी कोरोनावर यशस्वी मात

 

चोपडा, प्रतिनिधी । शहरातील नारायणदास नगीनदास गुजराथी  ८७ वर्षीय आजोबा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

 गेल्या दहा महिन्यापासून जगभरात करोनाचे संकट घोंगावत आहे. या संकटात असंख्य नागरिकांचा मृत्यूदेखील झाला. तर काही नागरिक त्यातून देवदूत अर्थातच वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांच्या कृपेने ठणठणीत झाले आहेत. वयाची साठी ओलांडलेल्या लोकांना या कोरोनापासून जास्तीचा धोका असल्याने त्यांना खूप जपावे लागते. 

शहरातील नारायणदास नगीनदास गुजराथी (प्रो.गितांजली स्टोर्स) त्यांचे सध्याचे वय ८७ वर्ष असून, त्यांना या कोरोनाच्या विषाणूने ग्रासले. हे ऐकून  सर्व गुजराथी कुटुंबीय चिंतेत पडले आणि त्यांना उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांकडे  उपचार सुरू केले.  येथील उपचार सुरू असताना  येथील समस्त डॉक्टर वर्ग, कर्मचारी, नर्सेस यांनी दिवसरात्र सुश्रुषा केली. यामुळे त्यांच्या अथक परिश्रमाने गुजराथी यांना हळूहळू बरे वाटू लागले. आणि तब्बल २५ दिवसांत  वयाच्या 87 व्या वर्षी  या कोरोनारुपी राक्षसाचा वध केला. विशेष म्हणजे, ते पुन्हा आपल्या कुटुंबीयांसोबत सुखरुप घरी परतले. खरंच या त्यांच्या नवीन जन्माबद्दल परिवाराला खूप हायसे वाटले. कारण, चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील सर्वश्री डॉ. मनोजदादा पाटील, डॉ. गुरुप्रसाद वाघ डॉ. कमलेश सर, सर्व सिस्टर, कर्मचारीवर्ग स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांचे हे फलित आहे. चोपडा येथील कोव्हिड केअर हॉस्पिटल खरोखरच एक आदर्श हॉस्पिटल आहे, असेच म्हणावे लागेल. 

येथील प्रत्येक स्टाफ हा देवमाणूस आहे. कोरोनाच्या संकटातही आपल्या जिवाची पर्वा न करता येथील प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबीयांपासून लांब आहे. मात्र, असंख्य कोरोनाग्रस्तांना सेवा देण्यासाठी तत्पर आहेत, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे असून त्यांच्या या वैद्यकीय सेवेला आमच्या गुजराथी कुटुंबीयांकडून मानाचा सलाम आणि त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देत गुजराथी कुटुंबातील सर्वांनी वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या स्टाफचे ऋण व्यक्त केले आहे.

Protected Content