जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चिंचखेडा येथे एका शेतात सायाळ या वन्यप्राण्याची मांस खाण्यासाठी शिकार करणाऱ्या एका जणाला मंगळवार 7 मार्च रोजी वडो दा वन विभागाने कारवाई करून ताब्यात घेतले आहे. निवृत्ती उर्फ बाबुराव रामचंद्र मेनकर रा. चिंचखेडा असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जळगाव जिल्ह्यातील चिंचखेडा येथे सुपळा रामचंद्र मेनकर यांच्या शेतात मंगळवारी सायाळ या वन्य प्राण्याची शिकार करून कापत असल्याची गोपनीय माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशींग , सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिराजदार , मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे ,वनपाल श्रीमती मराठे, वनरक्षक ज्ञानोबा धुळगंडे , राम असुरे, बापूसाहेब थोरात , गोकुळ गोसावी, अशोक तायडे , अशोक पाटील व इतर वनमजूर यांच्या पथकाने चिंचखेडा येथे घटनास्थळ गाठत कारवाई केली. या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाण्यात रक्ताने माखलेली काठी जमिनीवर पडलेले रक्त वन्यप्राणी सायाळचे चार पंजे व अर्धवट जळलेल्या स्थितीत वन्यप्राणी सायाळ चे काटे दिसून आले या ठिकाणी शेतकरी यांना ताब्यात घेऊन विचारपूस व चौकशी केली असता शंकर साहेबराव सपकाळ व ऋषिकेश सुरेश अहिरकर रा. चिंचखेडा यांच्या शेतातील शेडमध्ये वन्यप्राणी सायांचे मांस चुलीवर अर्धवट शिजलेले आढळून आले यानुसार पोलिसांनी चौकशी आणते निवृत्ती उर्फ बाबुराव रामचंद्र मेनकर राहणार चिंचखेडा यांना ताब्यात घेतल्या असून त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे