रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वनविभागाच्या जमीनीवर ट्रॅक्टरच्या सहाय्याने अतिक्रमण करणाऱ्या रोखल्याचा राग आल्याने संतप्त जमावाने वनविभागाच्या पथकावर दगडफेक केली.यात विभागाचे तिनं कर्मचारी जखमी झाल्याची घटना मंगळवारी २ मे रोजी मध्यरात्री गारबर्डी गावानजीक जंगलात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील गारबर्डी जवळील नियतक्षेत्रात ३ रोजी रात्री १२ वाजे दरम्यान कक्ष. क्र.२५ मध्ये काही इसम ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध अतिक्रमण करत आहे. अशी माहिती कक्ष. क्र.25 संरक्षण कुटीवरील रात्र गस्तीवर असलेले संरक्षण वनमजूर यांनी दुरध्वनीवरून वनक्षेत्रपाल अजय बावणे यांना दिली. त्या अनुषंगाने वनक्षेत्रपाल अजय बावणे , वनपाल, वनरक्षक, वनमजूर, संरक्षण वनमजूरसह घटना स्थळी पोचले. अवैध नागरटी करणारे लाल रंगाचे विना नंबर प्लेट नसलेले म्यासे फर्ग्युशन ट्रॅक्टर वनविभागाच्या पथकाने जप्त केले.
ट्रॅक्टर पळवून नेले
वनविभागाच्या पथकाने ट्रॅक्टर काही अंतरावर नेले असता. बेकायदा अतिक्रमण करणाऱ्या जमावाने (अपात्र वनहक्क दावेदार ) वनविभागाच्या पथकावर हल्ला केला. अंधारात तुफान दगडफेक सुरू केली. लाठ्या, काठ्या, कुऱ्हाडी, कोयता घेऊन वनविभागाचा कर्मचाऱ्यांना घेराव घातला. शासकीय कामात अडथडा निर्माण केला. यांचवेळी अंधाराचा फायदा घेत काही लोकांनी ट्रॅक्टर पळवून नेले. यात भ्याड हल्ल्यात वनरक्षक राजू बोडल, वनपाल दीपक रायसिंग व वनरक्षक युवराज मराठे हे तिनं वन कर्मचारी जखमी झाले. आरोपींता विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गारबर्डी प्रथम रिपोर्ट वनगुन्हा नोंद केला आहे. तसेच याबाबत रावेर पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता कलम ३५३, ३३२, ३३६, ३३७, ३४१,१४३,१४७,१४९ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास फौजदार विशाल सोनवणे व सहकारी करीत आहेत.