वनजमीनीवरील अतिक्रमण जेसीबीद्वारे हटविले !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील गारबर्डी, सुकी धरण परिसरातील वनविभागाच्या हद्दीत वनजमीनवर घुसखोरी करून अतिक्रमण केले होते. वनसंरक्षक दिगंबर पगार, उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वनजमीनीवरील अतिक्रमण काढण्यात आले.

 

सातपुडा पर्वताच्या जंगलात मोठया प्रमाणावर परप्रांतीय नागरीकांची घुसखोरी मोठया प्रमाणावर वाढली आहे.  घुसखोर परप्रांतीयांकडुन वनजमीनीवर असलेली मोल्यवान वृक्षांची कत्तल करून वनजमीनीव अवैद्यरित्या अतिक्रमण करण्यात आहे.  यावल तालुक्यातीलगारबर्डी सुकी धरण परिसरात राखीव वनखंड क्रमांक ३७ मध्ये अनधिकृत, अवैध असलेले वन जमिनीवरील अतिक्रमीत शेती क्षेत्र ०८ हेक्टर मध्ये खोल समतल चर खोदून आणि क्षेत्रात असलेले लाकडापासून बनविलेल्या ०४ झोपड्या काढून नष्ट करित वनजमिन अतिक्रमणमुक्त केले. सदरचे अतिक्रमणधारक ह्यांचे दुसऱ्या राखीव वनखंड मध्ये शेतीचे पट्टे मिळालेले असुन सुध्दा सदरच्या राखीव वनखंडमध्ये शेती आणि झोपड्या बांधून अतिक्रमण करत असल्याचे गस्ती दरम्यान आढळून आले. पुर्ण चौकशीअंती अवैध अतिक्रमण असल्याचे आढळून आले होते.

 

यावल वनविभागाच्या सातपुड्यात असे अतिक्रमण आढळून आल्यास  जिल्हाधिकारी अमन मित्तल जळगांव आणि उपवनसंरक्षक जमीर शेख यावल वनविभाग जळगांव यांचे सुचना नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल जेणे करून सातपुडामध्ये अवैध अतिक्रमनाला आळा बसेल. तसेच वन्यजीवांचे आश्रयस्थान मोकळे होईल. सातपुडातील जैव विविधता जतन होईल. या कामी सदर वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे कार्यवाही प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल, विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व, अतुल तायडे, वनपाल फैजपूर , रविंद्र तायडे वनपाल डोंगरकठोरा आणि वनरक्षक सुपडू सपकाळे, युवराज मराठे,भैय्यासाहेब गायकवाड,  गोवर्धन डोंगरे,तुकाराम लवटे,  प्रकाश बारेला,जिवन नागरगोजे, सतिष वाघमारे,गणेश चौधरी, चंद्रकांत बोरसे, वनमजुर बलदार तडवी आणि एस आर पी वनतुकडीचे जवान आदी वनअधिकारी, वनकर्मचारी यांनी संयुक्तरित्या कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही चौकशी करित रीतसर कायदेशीर करण्यात आली आहे. यापुढे असेच वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येईल.

Protected Content