कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील वनकोठे – बांभोरी येथील गृप ग्रामपंचायत हद्दीत घाणीचे साम्राज्य वाढले असून त्यामुळे .ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, येथील ग्रामपंचायत हद्दीत कासोद्या लगत असलेल्या अर्जुन नगर, सुभाष नगर , पांडे नगर, कृष्णा नगर, मार्केट यार्ड या भागांत ठिकठिकाणी घाण पडून आहे. त्या मार्फत रोगराईस आमंत्रण दिले जात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. गावांत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे . कचरा जागोजागी पडून असल्याने दुर्गंधी पसरत आहे त्याचप्रमाणे अशुध्द पाणी पिण्यास मिळत असल्याचीही ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
ठिकठिकाणी व्हाल गळती तर काही ठिकाणी पाईपलाईन फुटलेल्या अवस्थेत आहे. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग याकडे लक्ष देत नसून, दोन वेळा झालेल्या ग्रामसभेत मंजुर झालेले विषयही निकाली लागत नाही, पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, याकडे लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग व प्रशासनाने लक्ष द्यावे. अशी मागणी ग्रामस्थांनी एका पत्रकांद्वारे केली आहे.
यासंदर्भात लोकनियुक्त सरपंच उमेश श्रीराम पाटील याना विचारले असता त्यांनी सांगितले की, शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने व ग्रामस्थांनी कर भरलेले नाहीत म्हणुन ग्रामपंचायतीकडे पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत सफाई कामगारांना पगार देता येत नाही,.त्यामुळे ते कामावर नाहीत. आणि घाण साचते.