Home Cities यावल वढोदा प्र.सावदाचे संरपंच नंदकिशोर सोनवणे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

वढोदा प्र.सावदाचे संरपंच नंदकिशोर सोनवणे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

0
45

 

 फैजपूर : प्रतिनिधी । यावल तालुक्यातील रिधोरी, करंजी, वढोदा गृप ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकिशोर सोनवणे व सदस्य सचिन झाल्टे यांनी आज  वंचित बहुजन आघाडीत  प्रवेश  केला

 

जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे व तालुकाध्यक्ष मनोज  कापडे यांच्या  उपस्थितीत आज त्यांचा प्रवेश  झाला

 

आज फैजपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत विनोद सोनवणे म्हणाले की,  येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागले पाहिजे गावोगावी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता जाऊन  मतदारांना वंचित बहुजन आघाडीची भूमिका पटवून दिली पाहिजे प्रत्येक गावात बूथ बांधणीसाठी एक महिला व चार पुरुष तयार करून मतदान पक्षाला जास्तीत जास्त कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे

 

यावेळी प्रदेश सदस्या  शमिभा पाटील, जिल्हा प्रवक्ता ॲड. विनोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष महेद्र  सुरडकर,  रफिक  बेग, जिल्हा सचिव दिपक  मेघे,  आयटी जिल्हाप्रमुख सचिन बा-हे, यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे, तालुका सचिव राजेश गवळी, तालुका उपाध्यक्ष भगवान  मेघे, सागर झाल्टे, अमोल तायडे, शैलेद्र वानखेडे, बाळु तायडे, विद्या तायडे, सरला तायडे आदी उपस्थित होते

 


Protected Content

Play sound