Home क्राईम वडिलांनी टीव्ही बंद केला म्हणून मुलीने घेतला गळफास !

वडिलांनी टीव्ही बंद केला म्हणून मुलीने घेतला गळफास !


अलिबाग (वृत्तसंस्था) वडिलांनी टीव्ही बंद केल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तळा तालुक्यात घडली आहे.

या संदर्भात अधिक असे की, खांबोली गावात सर्व कुटुंबीय एकत्र टीव्ही पाहत होते. त्यावेळी ही मुलगीही त्यांच्यासोबत घरात टीव्ही पहात होती. परंतू थोड्यावेळानंतर वडिलांनी टीव्ही बंद केला. याचा राग आल्यानंतर मुलीने घराच्या दुसऱ्या खोलीत जाऊन साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.


Protected Content

Play sound