वडिलांकडून मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार ; पीडिता ४ महिन्यांची गर्भवती

चंद्रपूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात वडिलांनी मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करून चार महिन्याची गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

 

आरोपीने योगेश दोहतरे याच्या घरी त्याच्या मुलीची १२ वर्षीय मैत्रीण यायची. एकेदिवशी पिडीत मुलगी घरी आल्यानंतर आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबद्दल कुणाला सांगितले तर जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडित मुलीने याची माहिती कुटुंबियांनाही दिली नाही. याचाच फायदा उचलत आरोपीने तिच्यावर वारंवर बलात्कार केला. पीडितेणे दोन दिवसांपूर्वी आपले पोट दुखत असल्याचे आईला सांगितले. त्यानंतर आईने तिला डॉक्टरांकडे नेल्यावर ती ४ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. यानंतर मुलीने आई-वडिलांना सर्व हकीकत सांगितली. पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Protected Content