मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – एसटी संपकरी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे अड्.गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०७ आंदोलकांवर गावदेवी पोलीस ठाण्यात दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात किला कोर्टात अड्. सदावर्ते यांना हजर करण्यात आले असून सुनावणी सूरु आहे. वकील सदावर्तेना कोठडी कि जामीन दिला जातो याकडे सर्वाचेच लक्ष आहे.
गेल्या पाच महिन्यापासून मुंबई येथील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे शांततेत आंदोलन सुरु होते. सुनावणीनंतर निकाल देण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या कर्मचाऱ्यापैकी काही जणांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईस्थित निवास्थानी अचानक आक्रमकपणे आंदोलन केले. या घटनेमुळे खळबळजनक घडामोडींना वेग आला. त्यानंतर काही तासातच आंदोलनकर्त्यांची बाजू मांडणारे अड्. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करीत सोबतच घटनास्थळी १०७ आंदोलकाना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.
अड्.सदावर्ते यांच्या अटकेनंतर आज दुपारी मुंबई किला कोर्टात त्यांना हजर करण्यात येऊन सुनावणी सुरु सुरु आहे. त्यांना जामीन मंजूर करण्यात येतो कि कोठडी सुनावली जाते याकडे सर्वांचेच लक्ष आहे.