‘वंचित’ महाराष्ट्र बंदला काही ठिकाणी हिंसक वळण

best bus

मुंबई (वृत्तसंस्था) नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज, पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे.

 

‘वंचित’च्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण लागले आहे. चेंबूर परिसरात एका बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बस चालक जखमी झाला आहे. चेंबूर स्वस्तिक पार्क येथे सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बस क्रमांक ३६२ धावत असताना बसच्या पुढील काचेवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत बसची मोठी काच फुटली. बस चालक विलास दाभाडे (वय ५३) यांच्या दोन्ही हातांना काचेचे तुकडे लागले. यामुळे ते जखमी झाले असून त्यांच्यावर गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच पद्धतीने औरंगाबादमध्येही वाळूजकडे जाणारी सिटी बस फोडण्यात आली आहे. दुसरीकडे कोल्हापुरात बंदचा काहीच परिणाम झाला नसून जनजीवन सुरळीत आहे. मुंबईतील सायन-ट्रोम्बे रोड येथे वंचितच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको केला. तर अकोला शहरात शाळा आणि कॉलेज बंद होत्या. अहमदनगरमधील कर्जत शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

Protected Content