पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारा येथे ज्यांनी स्वच्छतेचा महामंत्र शिकवला व माणसात देव शोधला असे संत गाडगे महाराज यांची जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांची आरती करून झाली. ही आरती कवी मंगल दास मोरे यांची स्वलिखित असून ती त्या ठिकाणी गायली. समाजसेवक गजानन शिरसागर यांनी संत गाडगे महाराजांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकला व निस्वार्थ सेवा करून माणसात देव शोधावा व गाडगे महाराजांचे जीवन अंगीकारावे असे ठळक नमूद केले. रमेश लिंगायत यांनी संत गाडगे महाराजांचा अल्पपरिचय जमलेल्या श्रोत्यांना करून दिला. या कार्यक्रमासाठी सुभाष गीते, ज्ञानेश्वर राजपूत, मनोज अंबीकार, उमेश देशमुख, हिरामण बाविस्कर, शांताराम चौधरी, अनिल तडवी, शेनफडू कोळी, राजू कोळी, राजू लिंगायत, कैलास लिंगायत, सुनील जाधव, संजय शेवाळे, महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळ व नागरिक व हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण लिंगायत सर यांनी केले. व आभार रमेश लिंगायत यांनी मानले.