जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातून हद्दपार असतानाही लोखंडी सुरा घेऊन फिरणाऱ्या आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (२३,रा.रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी तलाव जवळून अटक केली आहे. त्याच्या विरोधात शुक्रवार ८ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या आशुतोष मोरे याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तो रामेश्वर कॉलनी परिसरात सुरा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, ललित नारखेडे, साई मुंढे यांनी गुरुवार ७ मार्च रोजी रात्री १० वाजता मेहरुण तलाव जवळील बांधाजवळून आशुतोषला ताब्यात घेतले.
त्याच्याजवळ एक लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी शुक्रवार ८ मार्च मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी हे करत आहे.