भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून गंभीर दुखापत केल्याची घटना भुसावळ शहरातील आगाखान वाडा येथे घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सोहेल मुनाफ कुरेशी (वय 22 रा. आगाखान वाडा शिवाजीनगर भुसावळ) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३ मे रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्याच्या घराजवळील मटन मार्केट जवळ सोहेल हा उभा होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून फराज बिस्मिल्ला तडवी (रा. तडवी वाडा, भुसावळ) याने येऊन सोहेल याच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून त्याला गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या सोहेलला भुसावळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी ४ मे रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी फराज बिस्मिल्ला तडवी याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक निलेश चौधरी करीत आहे.