Home राजकीय लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका ; नारायण राणेंची ठाकरे सरकारवर टीका

लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका ; नारायण राणेंची ठाकरे सरकारवर टीका


सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) सिंधुदुर्गाला २५ कोटींची मदत दिली, पण यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विविध योजनांतील २०० कोटी परत घेतले. ठाकरे सरकारने चेष्टा लावली असून कोणीही याबद्दल गांभीर्याने बोलत नाही. लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका, अशी टीका माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे केली आहे.

 

नारायण राणे यांनी म्हटले की, निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदूर्गाला करण्यात आलेल्या मदतीबाबत बोलताना ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे. पैसे परत घेतात आणि जिल्हाधिकारी आपल्या मर्जीने पैसे देत आहेत. कोणीही विरोध करत नाही. त्यामुळे कोकणाकडे पाहताना मच्छीमारांच्या नुकसानीकडे पहावे. फक्त फेरफटका मारुन काही होत नाही. लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका, अशी टीका देखील राणे यांनी केली आहे. एवढेच नव्हे, तर विरोधी पक्षाला सामोरे जायची ताकद सत्तारुढ पक्षामध्ये नाही त्यामुळेच अधिवेशन पुढे ढकलले जात असल्याचेही राणे यांनी म्हटले आहे.


Protected Content

Play sound