जळगाव, प्रतिनिधी । लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव सोहळा हा सोहळा एक सण म्हणूनच साजरा करण्यात येतो. परंतु या वर्षी कोरोना या साथीच्या आजारामुळे हा सोहळा एकत्र येवून साजरा न करता घरीच साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ प्रणित मल्हारसेना,कर्मचारी संघटना व अहिल्या महिला संघाच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येते की आपण हा अहिल्या जयंती महोत्सव सोहळा हा आपल्या कुटुंबासहीत साजरा करावा. आपण घरी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून प्रतिमा पूजन करावे आणि समतेचे प्रतीक पिवळे निशाण किंवा होळकरांचे निशाण घरावर किंवा अंगणात फडकावावे ही विनंती. आणि या पवित्र सोहळाचे फोटो आपण सोशल मिडियावर शेअर करावेत एकत्र न येता सोशल मिडियावर एकमेकांना शुभेच्छा देऊन जयंती उत्सव साजरा करावा आणि हेच खरे अहिल्यादेवींना अभिवादन ठरेल असे आवाहन धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर , जिल्हासरचिटणिस गणेश बागुल यांनी केले आहे.