लोकप्रिय गझलकार, शायर राहत इंदौरी यांचे निधन !

भोपाळ (वृत्तसंस्था) लोकप्रिय गझलकार, शायर राहत इंदौरी यांचे निधन झाले आहे. राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी प्राणज्योत मालवली. ते ७० वर्षांचे होते.

 

 

राहत इंदौरी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळले होते. इंदौरमध्ये त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहत इंदौरी यांचे सुपुत्र सतलज यांनी याविषयी माहिती दिली. नंतर स्वतः राहत इंदौरी यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली होती. मी आता हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे, माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा. पण एक विनंती आहे की, माझ्या घरी फोन करू नका, माझ्या तब्येतीबद्दल मी ट्वीटर आणि फेसबुकवर याची माहिती देत राहिल’ असे भावनिक आवाहनही त्यांनी केले होते. राहत इंदौरी हे प्रसिद्ध शायर तर होतेच, याशिवाय त्यांनी बॉलिवूडसाठीही अनेक गाणी लिहिली होती. इश्क, मिशन काश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, मर्डर अशा अनेक चित्रपटांची गाणी राहत इंदौरी यांनी लिहिली होती.

Protected Content