जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज । जळगाव शहरातील मध्यवर्ती जुने बसस्टॅण्डलगतच्या लॉटरी गल्लीत बेकादेशीर ऑनलाईन लॉटरी सेंटरवर परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी ३१ मे रेाजी रात्री ८ वाजता अचानक धाड टाकून चार संगणक संचासह ६८ हजार ६६० रुपयांचे साहित्य जप्त करुन चौघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक कुळकर्णी यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक रविंद्र बागुल, रतन गिते, बशीर तडवी, उमेश भांडारकर, विलास पवार, योगेश बोरसे यांच्या पथकाने बुधवारी ३१ मे रेाजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक लॉटरी सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी बाळू जाधवराव कोळी ( वय ३२, रा. घार्डी, ता. जळगाव), अजय पंडीत कोळी (वय २३, रा. वाल्मीकनगर) यांच्यासह इतर दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ४१ हजार ६६० रुपये रोख, सीपीयु, संगणक स्क्रीनसह ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर चिट्ट्या असा ऐवज जप्त करण्यात आला. पोलिस नाईक योगेश इंधाटे यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.