बेळगाव (वृत्तसंस्था) भाजपा आमदाराने आपल्या मुलीचे थाटात लग्न केल्याचा धक्कादायक बेळगावमध्ये प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे तीन हजार पाहुण्यांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची देखील उपस्थिती होती.
देशात लॉकडाउन लागू झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी राज्यातील जनतेला सर्व लग्न सोहळे पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. दुसरीकडे मात्र, कर्नाटकातील भाजपाचे आमदार महंतेश कवतागिमठ यांनी १४ मार्चला आपल्या मुलीच्या मोठ्या थाटात लग्न लावले. बेळगावमध्ये रविवारी हा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्याला तब्बल तीन हजार लोक उपस्थित होते. इतक्या मोठ्या संख्येने कार्यक्रमाला लोक उपस्थित राहणे हा कायद्याचा भंग होता. पण खुद्द मुख्यमंत्री येडियुरप्पाचं या लग्न सोहळ्याला उपस्थित राहिल्यामुळे आता टीका होत आहे. या विवाह सोहळ्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगदी, श्रीमंत पाटील, आमदार महेश कुमठल्ली यांच्यासह भाजपा, काँग्रेस आणि जेडीयूचे नेते उपस्थित होते.