लॉकडाऊन : घरात घुसत अंध महिलेवर बलात्कार !

भोपाळ (वृत्तसंस्था) लॉकडाउनचा गैरफायदा घेत एका नराधमाने ५३ वर्षीय अंध महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. पीडित महिला बँकेत मॅनेजर पदावर काम करते.

 

करोनामुळे सध्या देशभरात लॉकडाउन असल्यामुळे पीडित महिला गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात एकटीच राहत होती. तर महिलेचा पती राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील त्याच्या घरीच अडकलेला आहे. रात्री आपण झोपेत असताना एक अज्ञात व्यक्ती घरात घुसली आणि त्याने आपल्यावर बलात्कार केल्याचे दिलेल्या दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे घरांमध्ये एकट्या अडकलेल्या असहाय्य महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्च निर्माण झाले आहे.

Protected Content