भुसावळ प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. येथील संत सेना महाराज व्यपारी संकुलातील एका किरणा दुकानावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १० हजाराचा दंड मुख्याधिकारी यांनी ठोठावला आहे. या कारवाईमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.
देशभरात कोरोना कोवीड १९ आजाराने थैमान घातले असून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कुणीही नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचे आदेश दिले आहे. शहरातील संत सेना महाराज व्यापारी संकुलातील श्रीकृष्ण किराणा दुकानात सोशल डिस्टंटींगचे उल्लंघन करुन अनेक ग्राहक एका ठिकाणी गर्दी करुन नियमांचे भंग करून उभे असताना आज २१ एप्रिल रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या नेतृत्वाखाली लेखापाल संजय बनाईते, नगर अभियंता पंकज पन्हाळे, प्रशासकिय अधिकारी परवेज शेख, अधिकारी राजीव वाघ, सुरज नारखेडे, विशाल पाटील, महेश चौधरी, सचिन नारखेडे, सतिश बेदरकर, धनराज बाविस्कर, राजीव पाटील व लोहार यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई करीत दुकान मालक सुरेश तलरेजा यांना पकडून १० हजाराचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००