नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लॉकडाऊनमुळे लाखो मजूर तसेच इतर लोक देशातील विविध ठिकाणी पडलेले मजूर, कर्मचारी, विद्यार्थी यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याच्या निर्णयास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ही ट्रेन सेवा सुरु करण्यात येणार आहे. ट्रेन सेवा सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारांमध्ये समनव्य राहावा यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. तिकिटांच्या विक्रीसंबंधी रेल्वे मंत्रालय सविस्तर माहिती देईल असे आदेशात सांगण्यात आले आहेत. तसेच ट्रेन आणि स्थानकांवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासंबंधी तसेच सुरक्षेच्या इतर उपाययोजनांबद्दलही रेल्वे मंत्रालयाकडून सूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. प्रत्येक राज्याने प्रवाश्यांना पाठवण्याअगोदर त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. जे निरोगी प्रवासी आहेत, अशानांच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. सोबतचं या प्रवाशांच्या तुकड्या करुन पाठवण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी चालवण्यात येणाऱ्या रेल्वे आणि बस गाड्या सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घालणे बंधनकारक असेल. प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय प्रारंभीच्या स्टेशनवर पाठविणार्या राज्यांद्वारे करण्यात येणार आहे. दरम्यान, तेलंगाणामधील लिंगमपेल्ली येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घेऊन एक विशेष ट्रेन रवाना झाली आहे. ही ट्रेन आज झारखंडला पोहोचेल. या ट्रेनमधून एकूण १२०० मजूर प्रवास करत आहे.