भुसावळ संतोष शेलोडे । अनेक जण लॉकडाऊनचे उल्लंघन करत असतांना परीट धोबी समाजातील एक आदर्श विवाह सोहळा हा सर्वांच्या कौतुकाचा केंद्रबिंदू बनला आहे.
सध्या लॉकडाऊन सुरू असून सार्वजनीक कार्यक्रमांवर बंदी आहे. अर्थात, विवाहावर देखील बंदी लादण्यात आली आहे. मर्यादीत प्रमाणातील वर्हाडी मंडळींच्या उपस्थितीतील अर्थात, सोशल डिस्टन्सींगचे पालन केले असल्यास असा विवाह चालू शकतो. या अनुषंगाने धुळे येथे चि.सौ.कां. नंदिनी कापडे व चि. संदीप खलाणेकर यांचा विवाह अगदी मोजक्या वर्हाड्यांच्या उपस्थितीत पार पडला. यात सोशल डिस्टन्सींगचे पुरेपूर पालन करण्यात आले. याच्या जोडीला स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली.
परीट समाजातील ख्यातप्राप्त सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ वाल्हे यांनी या आदर्श विवाहासाठी पुढाकार घेतला. त्यांनी वर व वधू पक्षाला या प्रकारे अतिशय मोजक्या मंडळीच्या उपस्थितीत विवाह करण्यासाठी प्रेरीत केले. याच्या जोडीला पंडितबापू जगदाळे, सुनीलबाबा सपकाळे, योगेश खैरनार आदी समाजबांधवांनी या सोहळ्यासाठी प्रयत्न केले. यात पारंपरीक बाबींना फाटा देण्यात येऊन शासकीय नियमांचे पुरेपूर पालन करण्यात आले. यामुळे या विवाहाचे समाजातून कौतुक करण्यात येत आहे.
खाली पहा : या विवाह सोहळ्याबाबतचा व्हिडीओ.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००