अमळनेर प्रतिनिधी । पोलीसांनी अवैध धंद्याविरूध्द मोहीम हाती घेतली असून अमळनेर शहरातील कंजरवाड्यात धाड टाकले असता तब्बत ४५ लाख रूपयांची रोकड आणि अडीच किलो गांजा व गावठी दारू हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे अमळनेर शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस उपअधिक्षक राजेंद्र ससाने, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही धडक कारवाई करण्यात आली. प्राथमिक स्वरूपात एका महिलेकडे छापा टाकला त्यात ४५ लाखाची रोकड आणि अडीच किलो गांजा आढळून आला. आत्तापर्यंतच्या लॉकडाऊनच्या दोन महिन्याच्या कालावधीत ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. श्री ससाने यांनी अमळनेर तालुक्यात अवैध धंद्यांविरूध्द धडाका सुरू केला आहे. दरम्यान अवैध धंदे करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.