लॉकडाउन ३० नोव्हेंबरपर्यंत कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन ३० नोव्हेंबरपर्यंत कायम राहिल असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक गोष्टींना केंद्र सरकारने नियम आणि अटींसह संमती दिली आहे. मात्र करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन कायम असणार आहे असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.

देशभरात मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरु करण्यात आला. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत हळूहळू अनेक गोष्टींना संमती देण्यात आली आहे. प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसतो आहे. भारतातील रुग्णांच्या एकूण संख्येत वाढ झाली असली तरीही कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. अॅक्टिव्ह केसेसच्या संख्येतही घट झाली आहे. असं असलं तरीही संपूर्ण काळजी घेऊनच जिम, रेस्तराँ, हॉटेेल्स उघडण्यास केंद्र सरकारने संमती दिली आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउन पूर्वीप्रमाणेच ३० नोव्हेंबरपर्यंत असेल असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

Protected Content