Home आरोग्य लॉकडाउनसाठी तयार रहा ; मुख्यमंत्र्यांचा इशारा

लॉकडाउनसाठी तयार रहा ; मुख्यमंत्र्यांचा इशारा

0
25


 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य शासन अधिकच कठोरपणे निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. लॉकडाउनसाठी तयार रहा  असा इशारा   मुख्यमंत्र्यांनी  दिला आहे

 

या पार्श्वभूमीवर आज वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि कोविड टास्क फोर्स यांच्यासोबत पार पडलेल्या बैठीकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर लॉकडाउनच्यादृष्टीने सूचक इशारा देखील दिल्याचे दिसून आले आहे.

 

वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि कोविड टास्क फोर्स यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सूचना केली आहे की, जर लोकं   नियमांचे सातत्याने उल्लंघन करत असतील, तर लॉकडाउनसारख्या निर्बंधांसाठी तयार रहा.

 

 

तसेच मुख्यमंत्री म्हणाले, “लोकं मार्गदर्शक सूचनांचे गांभीर्याने पालन करत नसल्याने   रूग्णसंख्या वाढत आहे. म्हणून लॉकडाउन सारखी कठोर पावल विचारात घेणे आवश्यक आहे.”


Protected Content

Play sound