चोपडा प्रतिनिधी – लैंगिक शोषण मुक्त समाज निर्मितीसाठी लैंगिक शिक्षण काळाची गरज असून योग्य वयात योग्यवेळी लिंग, प्रजनन संस्था आदी बाबत मार्गदर्शन झाल्यास जीवन अधिक सुंदर करता येईल. असे प्रतिपादन डॉ. प्राजक्ता भामरे यांनी केले. महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्र व वाणिज्य महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समितीतर्फे २७ जानेवारी २०२० रोजी अनुसयाबाई मुंकुंदराव साळुंखे सभागृहात आयोजित लैंगिक शिक्षण काळाची गरज या विषयावरील व्याख्यानात बोलतांना डॉ.प्राजक्ता भामरे यांनी स्त्री-पुरुषात वयानुरूप शरीरात होणारे विवीध बदल तसेच, शारीरिक बदलानुसार कोणती काळजी घेतली पाहिजे या बाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते माजी शिक्षण मंत्री कै.ना.शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलीत करून करण्यात आले. या वेळी संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.आशा विजय पाटील,प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी,उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे,प्राचार्य सौ.रेखा पाटील,प्रा.एम.जी.पाटील आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समिती प्रमुख प्रा.माया शिंदे यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.शैलेश वाघ यांनी केले तर परिचय प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी करून दिला. आभार प्रा.सुनिता पाटील यांनी मानलेत. कार्यक्रमाला महाविद्यालयातील व ऑक्ससफर्ड इंग्लिश मीडियम स्कुल येथिल शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू-भगिनी उपस्थित होते.