जळगाव प्रतिनिधी । लैंगिक अत्याचार प्रकरणातील दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी एलसीबीच्या पथकाने जळगाव रेल्वे स्थानक येथून अटक करून रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस स्टेशन भाग -५ गुरनं. १७/२०१८ भा.द.वि. कलम ३७६, ३६३ व पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपी रामा सुरेश कसबे , वय- १९ रा. राजीवगांधी नगर , जळगाव हा सुरत येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने तो सुरत येथिल निलगरी सर्कल, रेल्वे फाटक जवळ, उधना येथे राहत होता. तो आज रोजी जळगाव येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाली होती.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक श्भाग्यश्री नवटके , सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील स.फौ. अशोक महाजन , पोहेकॉ.अनिल इंगळे , सुनिल दामोदरे, सुरेश महाजन , संतोष मायकल , रमेश चौधरी , मिलिंद सोनवणे , ईद्रीस पठाण यांना रवाना केले.
आरोपी रामा सुरेश कसबे हा जळगाव रेल्वे स्टेशन वर येताच वरील पथकाने जळगाव रेल्वे स्टेशन वर सापळा लावून त्यास ताब्यात घेतले असुन पुढील तपास कामी आरोपीस रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.