पहूर-लाईव्ह टेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर जामनेर तालुक्यातील लीहा तांडा येथील २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुरुवार ५ जानेवारी रोजी दुपारी ५ वाजता पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करत आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे २५ वर्षीय महिलाही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरूवारी ५ जानेवारी रोजी २ वाजेच्या सुमारास गावात राहणारा राम धनराज चव्हाण यांनी विवाहितेच्या घरात घुसून तिचा हात पकडला व माझ्यासोबत चल असे म्हणून तिचा विनयभंग केला. दरम्यान विवाहितेने आरडा ओरड केल्यानंतर संशयित आरोपी राम चव्हाण हा पसार झाला. घटनेची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर पिढीचे नातेवाईकांनी तातडीने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राम धनराज चव्हाण यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत वीरनारे करीत आहे.