हैदराबाद (वृत्तसंस्था) लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका विवाहित महिलेवर कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शुक्रवारी रात्री पीडित महिला आपल्या गावी जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला गाडीची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी आरोपीने तिला आपल्या गाडीमध्ये लिफ्ट दिली. त्यानंतर महिलेला इच्छित स्थळी सोडण्याऐवजी, आरोपी निर्जन स्थळी गाडी घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे पिडीत महिला ज्या गावात राहते, आरोपी सुद्धा त्याच गाव रहिवाशी आहे.