जळगाव, प्रतिनिधी । येथील लायन्स क्लब जळगाव गोल्ड सिटी तर्फे विश्व् सेवा सप्ताह आठवडा राबविण्यात येत असून या अंतर्गत वृक्षारोपण, औषधी गोळ्यांचे वाटप, रक्तदान शिबीर घेण्यात आले. उपक्रमांना नागरिकांमधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
लायन्स क्लबतर्फे २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान विश्व् सेवा सप्ताह आठवडा राबविण्यात येत आहे. वर्षभरात १,२०० वृक्ष लागवड करण्यात आले आहे. तर सप्ताहातर्गत नुकतीच ५० वृक्ष लावण्यात आले. तसेच कोरोना निर्मूलनासाठी प्रतिकारशक्ती मजबूत करायला अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे शहरातील अनेक नागरी वस्तीत वाटप करण्यात आले. यावेळी कोरोना साथरोगाविषयी माहिती देण्यात आली.
लायन्स क्लबने लिओ क्लब, इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या मदतीने रक्तदान शिबीर घेतले. यात प्रादेशिक प्रमुख रितेश छोरीया, रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन यावेळी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये २० दात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमांसाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष उमेश सैनी, सचिव अमित कोठारी, लेखराज उपाध्यय, कोषाध्यक्ष व प्रकल्प प्रमुख प्रशांत अग्रवाल, गिरीश सिसोदिया, सुरेंद्रनाथ मिश्रा, पराग आगिवाल, मोहन छोरिया, पदम छोरिया, योगेश बिर्ला, नितिन जैन, बलदेव उपाध्याय, गौरव मिश्रा, निर जैन, जय पोपटानी, कपिल लढ्ढा, चिन्मेश सिसोदिया उपस्थित होते.