Home क्राईम लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षकास शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षकास शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा


जळगाव प्रतिनिधी ।  लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी जाऊन अधीक्षकास शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेले लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात अधिक्षक श्रीकांत दिलीपराव दळवी हे आज गुरूवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता त्यांच्या दालनात असतांना  विवेक ठाकरेसह पाच-सहा जण कार्यालयात आले. त्यांनी सेवानिवृत्त अभियंता एल. एम. शिंदे यांच्यासह इतरांनी अपहार केला असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा. त्यांना बेड्या ठोका या संदर्भात निवेदन दिले. यानंतर थेट दळवी यांना शिवीगळ करुन कार्यालयात गोंधळ घातला. दळवी यांनी निवेदन स्विकारल्यानंतर देखील ठाकरेसह इतरांनी शिवीगाळ केल्यामुळे कार्यालयात गोंधळ उडला. दरम्यान, या प्रकरणी दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ठाकरेसह पाच-सहा अनोळखी लोकांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound