जळगाव प्रतिनिधी । पाळधी येथील पोलिस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सुमित पाटील यांनी १५ हजार रूपयांची लाच प्रकरणी अटक करण्यात आली होती. लाचेची प्रकरणामुळे पाळधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची उचलबांगडी करत कंट्रोल जमा केले आहे.
अपघातातील वाहन सोडण्यासाठी वाहन मालकाकडून पंधरा हजाराची लाच घेतांना सुमित संजय पाटील या पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 11 जानेवारी रोजी अटक केली. सुमीत पाटील हा सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड यांचा रायटर होता. रायटरने लाच घेतल्याने पाळधी दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी नियंत्रण कक्षात जमा केले.