‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’चा दणका : फैजपुरातील स्मशानभूमीत अखेर उजेड !

फैजपूर, ता. यावल-निलेश पाटील | येथील स्मशानभूमीत अंधकाराचे साम्राज्य असल्याबाबतचे वृत्त लाईव्ह ट्रेंडस न्यूजने प्रकाशित केल्यानंतर अखेर नगरपालिका प्रशासनाला जाग आली असून सकाळीच येथे पथदिवे लावण्यात आले आहेत.

 

याबाबत वृत्त असे की, फैजपूर शहरातील दक्षिण बाहेर पेठ मधील स्मशानभूमीत सर्व लाईट बंद असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. सध्या शहरातील सोशल मीडियावर दक्षिण बाहेर पेठ भागातील स्मशानभूमीतील मोबाईलच्या बॅटरी च्या साहाय्याने  मृतदेहावर  अग्निडाग दिला जात असल्याचे फोटो व्हायरल झाले होतेे. याबाबत लाईव्ह ट्रेंडस न्यूजने काल रात्री वृत्त प्रकाशित केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यामुळे शहरातून संतप्त प्रतिक्रिया देखील उमटली होती.

 

दरम्यान, या वृत्ताची फैजपुर नगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. आज सकाळी नऊ वाजताच नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी स्मशानभूमीत जाऊन पथदिवे लावले. या भागात काही टारगट तरूण वायर तोडत असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. तर येथील शौचालयाचा वापर परिसरातील नागरिक करत असल्याने येथे अस्वच्छता पसरल्याचे देखील दिसून येत आहे. यामुळे नागरिकांनी देखील आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Protected Content