लवकरच १२ तासांची होणार ड्युटी !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रातील मोदी सरकार नवीन कामगार कायदा करण्याच्या तयारीत असून यात दैनंदिन काम हे नऊ तासांवरून १२ तास करण्याचा नियम देखील असणार आहे. तर कर्मचार्‍यांना नवीन कायद्याद्वारे वाढीव पीएफ मिळणार आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कामगार कायद्यात बदल करण्यात येणार असून याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. यात विद्यमान अनेक बाबींमध्ये बदल होणार आहे. केंद्रानं नव्या कायद्यात कामांच्या तासांमध्ये वाढ करुन १२ तास करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यात पाच तासांनंतर प्रत्येकी अर्ध्या तासाचा विराम मिळणार आहे. ड्राफ्ट नियमांमध्ये कोणत्याही कर्मचार्‍याकडून ५ तासांपेक्षा जास्त सलग काम करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार कर्मचार्‍यांना प्रत्येक ५ तासांच्या कामानंतर अर्धा तासाची विश्रांती देणं गरजेचं असणार आहे.

नव्या बदलांनुसार मूळ वेतन हे एकूण वेतनाच्या ५० टक्के अधिक असणं गरजेचं आहे. यामुळे अधिकाधिक कर्मचार्‍यांच्या पगार रचनेत बदल होणार आहे. कारण, कारण वेतनाचा भत्त्यांव्यतिरिक्त असलेल्या भाग हा एकूण पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असणार आहे. तर एकूण वेतनात भत्त्यांचा हिस्सा हा अधिक होणार आहे. त्यामुळे मूळ वेतनात वाढ होणार असल्यानं तुमच्या पीएफमध्ये वाढ होणार आहे. कारण, पीएफ हा मूळ वेतनावर आधारित असतो. मूळ वेतनात वाढ होणार असल्यानं आता कामगाराच्या हातात येणार्‍या पगारात कपात होणार आहे. तथापि, ग्रॅच्युटी आणि पीएफच्या रकमेत वाढ होणार असल्यानं तुमच्या निवृत्तीनंतर मिळणार्‍या एकूण रकमेत वाढ होणार आहे.

Protected Content