पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील कोरोनाचे नियम शिथिल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करून लवकरच राज्यात कोरोना नियम शिथिल करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्के असून राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ९ टक्के. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर आपली बाजू मांडली. ते म्हणाले, कोवॅक्सिन लसीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे १५ ते १८ वयोगटालीत लसीकरणाचा वेग सध्या मंदावला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रासोबत चर्चा करणार आहे. त्याचबरोबर सध्या थिएटरमधे ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांशी बोलून यामध्ये शिथिलता आणणार आहे.