Home क्राईम लग्नाच्या १५ दिवसांनतर दीड लाखांचे दागिने घेऊन नववधूचा प्रियकरासोबत पोबारा

लग्नाच्या १५ दिवसांनतर दीड लाखांचे दागिने घेऊन नववधूचा प्रियकरासोबत पोबारा

Marriage Certificate
Marriage Certificate


अहमदनगर (वृत्तसंस्था) लग्नानंतर अवघ्या १५ दिवसातच नववधूने दीड लाखांचे दागिने घेऊन आपल्या प्रियकरासोबत पोबारा केल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

बारामती तालुक्यातील तरुणीचे लग्नापूर्वीच तरडोली गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तिचा विवाह २५ जूनला श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे राहणाऱ्या युवकाशी झाला होता. त्यानंतर ११ जुलैला तिने पतीच्या घरातून जवळपास दीड लाख रुपये किंमतीचे दागिने घेऊन आपल्या प्रियकराबरोबर पसार झाली. या प्रकरणी पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणी प्रियकरासोबत आळंदीला पळाली असून तिथे जाऊन त्या दोघांनी लग्न केल्याचे पहिल्या पतीने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, लग्नानंतर नवऱ्यासोबत देवदर्शनाला गेल्यानंतर नवविवाहिता चक्क प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना वर्षभरापूर्वी अहमदनगरमध्येच घडली होती.


Protected Content

Play sound