Home क्राईम लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा गजाआड

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा गजाआड


bhusawal 1

भुसावळ प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवून पळवुन अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करणारा आरोपी भुसावळ बाजार पेठ पो.स्टे.पोलीसांनी अटक केली आहे. भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात बालकांचे लैगींक अपराधांपासुन संरक्षण अधिनियमाप्रमाणे १० फेब्रुवारी २०२० रोजी गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्यातील फरार आरोपी याची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत सो यांना मिळाल्या गुप्त बातमी वरुन आरोपी नामे- शाहरूख शेख उर्फ रघु शाहबुद्दीन (वय-२२) रा. गांधी कॉलनी चित्र टॉकीजचे मागे लालबाग बह्रानपुर (मध्य प्रदेश) हा भुसावळ शहरात टिंबर मार्केट परिसरातील आखाडा भागातून सापडा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. तस्लिम पठाण, पोहेकॉ अयाज सैय्यद, पो.ना.रमण सुरळकर, किशोर महाजन, संदेश निकम, पोकॉ विकास सातदिवे, रविंद्र तायडे, ईश्वर भालेराव अशानी केली आहे.


Protected Content

Play sound