Home Cities एरंडोल लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर वारंवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एरंउोल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारी ३५ वषीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. साड्या विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. मार्च २०२० मध्ये महिलेची ओळख एरंडोल तालुक्यातील विखरण येथील उदयसिंग अंकूश मारूती महाजन याच्याशी झाली. त्यानंतर उदयसिंग महाजन यांने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार दिला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी उदयसिंग अंकूश मरूती महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहे.


Protected Content

Play sound