जामनेर, प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर भ्याड हल्ल्या करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नेत्या व मध्यवर्ती बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर अज्ञात इसमाने जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेचा निषेध करत सदर आरोपीला तात्काळ कारवाई करून अटक करा या मागणीचे लेखी निवेदन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जामनेर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला च्या वतीने पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना देण्यात आले आहे.
यावेळी शहर अध्यक्षा सुनीता सूर्यवंशी, कविता बोरसे, दिपाली पाटील, कमलबाई सोनवणे, शुभांगी राजपूत, रत्ना पाटील, दगडाबाई मस्के, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, राजेश नाईक, विशाल पाटील, वैभव बोरसे, माधव चव्हाण, एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे, नरेंद्र पाटील, दीपक चव्हाण, नाना राजमल पाटील, अशोक चौधरी, अनिल तडवी यांच्यासह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.