रोशन कच्छवा यांचा रयत सेनेच्या वतीने सत्कार

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  केद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ६२० रॅंक मिळवत  चाळीसगावचा भुमिपुत्र रोशन कच्छवा यांनी यश प्राप्त करून झेंडा रोवल्याने शहरातील उदेसिंगआण्णा नगर येथे रयत सेनेच्या वतीने त्यांचा  सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.

 

त्यांचा आदर्श चाळीसगाव तालुक्यातील तरुणांनी घेऊन मार्गक्रमण करावे असे आवाहन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केले आहे.

याप्रसंगी रयत सेना  संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे अध्यक्ष खुशाल पाटील , प्रदेश सचिव प्रमोद वाघ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड,शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे,तालुकाउपाध्यक्ष मुकुंद पवार,भरत नवले,शहर अध्यक्ष छोटु अहिरे,शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे,शहर संघटक दीपक देशमुख,शहर उपाध्यक्ष सतीश पवार तर मेरा गाव मेरा तीर्थचे विजयभाऊ शर्मा व केवलसिंग कच्छवा यांच्यासह  रयत सेना पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

Protected Content