रेशनप्रमाणे मर्यादेत मिळणार पेट्रोल आणि डिझेल ; मिझोरम सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाव्हायरसमुळे तेलाच्या टँकरने मिझोरममध्ये जावू शकलेले नाहीत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवत असल्यामुळे लोकांना रेशनप्रमाणे मर्यादेत पेट्रोल आणि डिझेल देण्याचा निर्णय मिझोराम राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

 

मिझोरम सरकारने वाहनांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे प्रमाण निश्चित केले आहे. आता राज्यात स्कूटरसाठी फक्त ३ लीटर, बाईकसाठी ५ लीटर आणि कारसाठी १० लिटरची मर्यादा निश्चित केली आहे. zeebiz.com नुसार, केवळ २० लिटर डिझेल मॅक्सॅबॅब, पिक-अप ट्रक आणि मिनी ट्रकमध्ये भरता येऊ शकणार आहे. सिटी बस आणि इतर ट्रकची मर्यादा १०० लिटर निश्चित करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलही केवळ वाहनांसाठी मिळणार आहे. कॅन, बाटली किंवा इतर कोणत्याही सामग्रीत तेल भरण्यास संपूर्ण बंदी असेल.

Protected Content