जळगाव – रेल्वे स्थानकावर शालक यास घेण्यासाठी आलेल्या चेतन संजय करोसिया वय 22 रा. कोल्हे हिल्स, न्यु लक्ष्मीनगर यास दहा ते 12 जणांनी काचेचे ग्लास, बाटल्यांनी बेदम मारहाण करुन चॉपरने जखमी केले होते. या गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार असलेल्या विशाल उर्फ सैराट सुनील बाविस्कर वय 19 रा. आर.एम.कॉलनी, हरिविठ्ठल नगर, व आकाश रमेश पठारे वय 23 रा. गेंदालाल मिल या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.
काय घडली होती घटना
चेतन करोसिया हे 14 मार्च रोजी दुपारी 12.45 वाजता शहरातील रेल्वे स्थानकावर बाहेरगावाहून येत असलेल्या त्यांच्या शालकाला घेण्यासाठी आले होते. रेल्वे स्थानकावर जवळ एका निंबु शरबतच्या लोटगाडीवर उभे असतांना एक जण करोसिया यांच्याकडे येवून त्यांना रात्री तुमच्या घरासमोर जास्त वाजत होता, आत बोल काय करतो, असे म्हणून त्याच्यासह इतरांनी करोसिया यांना तोंडावर, हातावर छातीवर, पाठीवर चापटा बुक्क्यांनी तसेच काचेच्या ग्लास व बाटल्यांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी मारहाण करणार्यांपैकी एकाने चॉपरने वार केले होते. तसेच करोसियाींच गळ्यातील चैन, हातातील दोन अंगठ्या असा 1 लाख 2 हजार रुपयांचे दागिणे हिसकावून नेले होते. जखमी करोसियांनी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या पथकाने केली दोघांना अटक
मारहाणीचा प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला होता. त्यानुसार काही संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार असलेले संशयित विशाल बाविस्कर तसेच आकाश पठारे यांच्या बाबत शहर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे, योगेश इंधाटे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरिक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासअधिकारी दुय्यक पोलीस निरिक्षिक भिमराव नंदुरकर, योगेश सपकाळे, तेजस मराठे, योगेश इंधाटे, गणेश शिरसाळे, रतन गिते, अक्रम शेख यांच्या पथकाने संशयित विशाल बाविस्कर व आकाश पठारे यांना दोघांना अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.