नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही. सध्या कार्यरत असलेल्या रेल्वेच्या सर्व सेवा चालविल्या जातील, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, देशभरातील रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणावरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट केले की, कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जात नाहीये. सध्या सुरू असलेल्या रेल्वेच्या सेवा त्याच मार्गाने धावतील. खासगी सहभागासह १०९ मार्गांवर १५१ अतिरिक्त आधुनिक रेल्वे गाड्या चालवल्या जातील. ज्याचा रेल्वेगाड्यांवर काही परिणाम होणार नाही. परंतु गाड्यांच्या आगमनामुळे रोजगार निर्माण होईल. रेल्वेचे कोणत्याही प्रकारे खासगीकरण केले जात नाही, सध्या सुरू असलेल्या रेल्वेच्या पूर्वीप्रमाणेच सर्व सेवा सुरू राहतील. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने खासगी कंपन्यांना 109 मार्गावर प्रवासी गाड्या चालविण्यास दिल्या होत्या. ज्यामध्ये खासगी कंपन्यांना 30 हजार कोटींची गुंतवणूक करावी लागली. त्यानंतर गाड्यांच्या खासगीकरणाबाबत चर्चा सुरू झाल्या.